लेह शहराच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण देणारे पर्यटक हवेत की, वर्षभर थोडे थोडे आणि तेही लडाखमध्ये सर्वत्र जाणारे पर्यटक हवेत? 

अटल बोगद्यामुळे एकीकडे प्रमाणाबाहेर पर्यटक यायची भीती असली तरी तिलाच उलटवून सोय म्हणून पाहिलं तर चार महिन्यांत होणारी गर्दी आता वर्षभर वाटता येईल. स्विझर्लंड, स्कँडेनेवियन देश किंवा थंडीतली अमेरिका वा कॅनडा बघायला असंख्य भारतीय पर्यटक जातातच. मग, त्याच किंवा तशाच पर्यटकांनी थंडीतलं लडाख करायला काय हरकत आहे? दिवसा अगदी शून्यापर्यंत उतरणारं तापमान जानेवारी-फेब्रुवारीच्या रात्री हमखास उणे २५, उणे ३०पर्यंत जातं.......